राष्ट्रीय क्रीडा दिन व फिट इंडिया अभियान अंतर्गत ज्युनिअर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धेत मुलांमध्ये व मुलींमध्ये महाराष्ट्र संघ विजेता

महाराष्ट्र: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच भारत सरकार, क्रीडा व युवा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रीय क्रीडा दिन व फिट इंडिया अभियान अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी व प्राचीन आणि स्वदेशी खेळ भारतीय लगोरी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वी ज्युनिअर (एकोणीस वर्षा खालील ) राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद स्पर्धा ही श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट सावर्डे, चिपळूण,महाराष्ट्र येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडली।
या स्पर्धेत भारतातील १० राज्यातून मुलांचे व मुलींचे संघ सहभागी झाले होते।
स्पर्धेचे उद्घाटन मुख्य अतिथी रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे,भोजपुरी अभिनेता,फायटर मास्टर प्रिंस मिश्रा यांच्या हस्ते हॉकी चे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला व लगोरीचे जनक स्व.संतोष गुरव सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलन करून तसेच लगोरी फोडून करण्यात आले यावेळी प्राचीन आणि स्वदेशी खेळ भारतीय लगोरी फेडरेशन चे डायरेक्टर भरत प्रल्हाद गुरव,विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित स्पोर्ट्स ऍकॅडमीचे संचालक me श्रीकांत पराडकर, चिपळूण तालुका क्रीडा अधिकारी सुनील धारूलकर,अॅम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडिया चे सचिव ॲड.प्रिया गुरव, खजिनदार विजय लोणारे, मध्य प्रदेश लगोरी संघटनेचे सचिव सूर्यदत्त जोशी, ठाणे येथील सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी लक्ष्मी ठाणेकर, मुंबईचे राकेश शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.स्पर्धा चालू होण्यापूर्वी सहभागी राज्यातील संघांनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्राचीन पारंपारिक शिवकालीन युद्धकला सादरीकरण यामध्ये दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी,भाला इत्यादी प्रकारचे सुंदर असे थरारक सादरीकरण संतोषकुमार सुतार (शिवकालीन युद्धकला मुख्य प्रशिक्षक कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय गुरव यांच्या ग्रुप ने केले. यानंतर स्व. संतोष गुरव यांना श्रद्धांजली वाहून खेळाडूंनी सामूहिक शपथ घेतली।
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी आणि प्राचीन व स्वदेशी खेळ भारतीय लगोरी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर राष्ट्रीय लगोरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.आजची पिढी संगणक आणि मोबाईलच्या खेळात गुरफटत चालली असल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे. आताच्या संगणकीय युगात अनेक पारंपारिक खेळ नामशेष होत चालले असताना लगोरी सारख्या देशी खेळाला संतोष गुरव यांनी संजीवनी देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे।
खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून तो शरीर व मनाचा सर्वांगीण विकास घडवतो. देशी खेळांचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. लगोरीसारख्या खेळांमुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक विकास व संघभावना वाढते. शालेय स्तरावर हा खेळ विनाअनुदानित असला तरी त्याची लोकप्रियता वाढत आहे. अधिकाधिक खेळाडूंनी या खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी यावेळी केले।
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्य अतिथी म्हणून भोजपुरी अभिनेता,फायटर मास्टर प्रिंस मिश्रा,विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे संचालक श्रीकांत पराडकर,प्राचीन आणि स्वदेशी खेळ भारतीय लगोरी फेडरेशन चे डायरेक्टर भरत गुरव, अॅम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष संदीप,सचिव ॲड.प्रिया गुरव, खजिनदार विजय लोणारे, बिझनेसमन अजित दळवी,विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित स्पोर्ट्स ऍकॅडमीचे प्रशिक्षक विनायक पवार व प्रतीक्षा पेंढारे, मुंबई लगोरी संघटनेचे सचिव राजेश शेठ ह्यांच्या उपस्थितीत व सहभागी सर्वं राज्यांचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सहभागी सर्वं राज्यांचे सामने हे रोमांचक व अटीतटीचे झाले।
लगोरी टीम स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपद मिळविले, तर उपविजेतेपद तेलंगणा संघाने पटकावले, तर तृतीय स्थान तामिळनाडू व कर्नाटक संघाला मिळाले।मुलींमध्ये ही महाराष्ट्र संघाने सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपद मिळविले तर उपविजेतेपद तेलंगणा संघाने मिळविले तर तृतीय स्थान तेलंगणा व झारखंड संघाला मिळाले।
मुलांमध्ये बेस्ट प्लेयर अवॉर्ड महाराष्ट्र मधील तन्मय पाटील याला तर मुलींमध्ये तेलंगणा मधील एम. श्रावंती यांनी पटकावले।टार्गेट लगोरी प्रकारात मुलांच्या गटात झारखंड संघाला विजेते पद, मध्यप्रदेश संघाला उपविजेतेपद, तर तृतीय स्थान दादरा-नगर हवेली व आंध्रप्रदेश संघाने मिळवले तर मुलींच्या गटामध्ये मध्यप्रदेश संघाला विजेतेपद,तामिळनाडू संघाला उपविजेतेपद तर तृतीय स्थान पाँडिचेरी व मुंबई संघाने पटकावले।या स्पर्धेतून निवडलॆला मुले व मुलींचे संघ दिनांक २३ ते२५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेत सहभागी होणार आहेत।
स्पर्धा यशस्वी करण्यास मोलाची भूमिका बजावलेले पंच म्हणून सुधीर नाझरे,विशाल मुदावत,पुनित राज नागराज एस. गोंड,श्रीनाथ बी,सचिन कडावत, दीपक सुतार तर मुख्य रेफरी म्हणून राकेश शेठ,भरत गुरव यांनी काम पाहिले अश्या सर्वं पंचाना व सहभागी राज्यातील संघ व्यवस्थापक,प्रशिक्षक यांना हि सन्माचिन्ह व टीशर्ट, ट्रेकशुट, ब्लेझर मान्यवरांकडून देवून सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे उकृष्ट सूत्रसंचालन रविंद्र जाधव यांनी केले।



